Ladki Bahin Yojana News Today

Ladki Bahin Yojana News: मित्रांनो राज्यामध्ये लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आणि या योजनेचे काही हप्ते राज्यातील महिलांच्या अकाऊंट मध्ये जमा देखील झाले आहेत. पण गेल्या एक ते दोन महिन्यापासून हप्ता मिळाला नाहीये. परंतु मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
आता नेमक पुढचा हप्ता राज्यातील महिलांना कधी मिळणार आहे? आणि तो हप्ता 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये याबद्दल ही माहिती त्यांनी दिली आहे. तसेच ते इतर गोष्टिही तपासणार आहेत. अशी सर्व महत्वाची माहिती पुढे मित्रांनो या योजनेबद्दल काही नवीन अपडेट येताच तुम्हाला आपल्या ग्रुप मध्ये त्याची सूचना मिळेल त्यामुळे ग्रुप नक्की जॉइन करून ठेवा. आणि ही माहिती तुमच्या बहीणीं तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा. (Ladki Bahin Yojana News)
दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
Ladki Bahin Yojana December Installment
लाडकी बहीण योजना डिसेंबर हप्ता : आत्ताच राज्यातील निवडणुका पार पडल्या आणि महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. आणि राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे झाले आहे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे झाले आहेत. दरम्यान, निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
आणि आता सगळ्यांचे लक्ष या आश्वासनकडे आहे. आता हे पैसे नेमके कधी मिळणार? असे लाभार्थी महिलांकडून विचारले जात आहे. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे. आगामी अर्थसंकल्पात आम्ही त्यावर विचार करू, असं फडणवीस यांनी सांगितलंय.
हेही वाचा : Van Vibhag Buldhana Bharti 2024: वन विभाग, बुलढाणा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! येथून करा अर्ज
Ladki Bahin Yojana 2100 Hapta
महिलांना मिळणार 2100 रुपये :
देवंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार? असे विचारण्यात आले यावर बोलताना “सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहेत अशी हमी त्यांनी दिली आहे.
तसेच महिलांना मिळणारा लाभ 2100 रुपये करणार आहोत. आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. Ladki Bahin Yojana News
करण्यात येणार अर्जाची छाननी :
त्यांनी माध्यमांना बोलताना हेही सांगितले आहे की महिलांना 2100 रुपये मिळणार हे नक्की आहे. आम्ही जी आश्वासनं दिली त्या पूर्ण करणार आहोत. ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, त्या आम्ही आधी करू. आणि योजनेच्या छाणनीबद्दल बोलायचं झालं तर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल, त्यांना लाभ मिळणारच आहे.
परंतु या योजनेमद्धे काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असूनही लाभ मिळत आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत. तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती, तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला होता, असे समोर आले होते. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वत: समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत, असे सांगितले होते. Ladki Bahin Yojana News
त्यानंतर ती योजना स्थिर झाली. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल. या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता महिलांना पुढचा हप्ता नक्की कधी येणार आहे याबद्दल त्यांनी ठराविक दिवस सांगितला नाहीये.
मित्रांनो या योजनेबद्दल काही नवीन अपडेट येताच तुम्हाला आपल्या ग्रुप मध्ये त्याची सूचना मिळेल त्यामुळे ग्रुप नक्की जॉइन करून ठेवा. आणि ही माहिती तुमच्या बहीणीं तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा. Ladki Bahin Yojana News

सविस्तर माहिती (Details) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
हेही पहा :
Thank You!