Ladki Bahin Yojana News Today
राज्यातील महिलांसाठी आजची ही Ladki Bahin Yojana News Today धक्कादायक आहे. कारण आता बऱ्याच महिला योजनेतून वगळण्यात येणार आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यात जोमात असून त्यांना डिसेंबर चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि आता लाभार्थ्यांना 1500 वरुन 2100 रुपयांचा हप्ता कधी दिला जाणार याचीच चिंता आहे.
आणि याबद्दलची बातमी लाडक्या बहिणींना लवकरच कळणार आहे, तर दुसरीकडे लाडकी बहिण योजनेत घुसखोरी करणाऱ्या लाडक्या बहीणींची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे लाडकी बहिण योजना अधिक पारदर्शक होणार आहे. पुढे तुम्हाला या बद्दलची सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. Ladki Bahin Yojana News Today
अशा महत्वाच्या अपडेट रोज हव्या असतील तर आमच्या ग्रुप ला लगेच जॉइन करा.
लाडकी बहीण योजना नवीन अपडेट

अदिती तटकरेंनी दिली माहिती : महाराष्ट्र सरकार लाडकी बहिण योजनेच्या बनावट लाभार्थींबद्दल सरकार खबरदारी बाळगत आहे. आणि त्यामुळेच आता या योजनेमधील अपात्र असलेल्या महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. कारण अपात्र असून देखील काही महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आयकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागवली असल्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी केली. केवळ अपात्र प्राप्तकर्त्यांशी संबंधित तक्रारींवर लक्ष केंद्रित केले जाईल. Ladki Bahin Yojana News Today
माझी लाडकी बहीण योजना माहिती
महाराष्ट्र राज्य चे पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माझी लाडकी बहिण योजना सुरू केली होती. योजनेतील पात्र महिलांना 1,500 रुपये हप्ता मिळत आहे. 20 नोव्हेंबरच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या यशात या योजनेचा हातभार लागला होता. मात्र, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांचा आढावा घेण्याची सूचना केली आहे.
लाडकी बहीण योजना पडताळणी
लाडकी बहीण योजना मधील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी नेमकी कशा पद्धतीने होणार याची माहिती अदिती तटकरे यांनी अनेक आव्हानांसंदर्भात सांगितली आहे. यात आधार मॅच न होणाऱ्या अनेक अर्जांचा समावेश आहे. काही लाभार्थी लग्नानंतर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाल्यामुळे अधिवासाची समस्याही समोर आली आहे.
उदाहरणार्थ, काही महिलांनी लग्नानंतर कर्नाटकात स्थलांतर केले आहे, तर दुसरीकडे लाभासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या घटना घडल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांची देखील तपासणी होणार आहे.
जर एखाद्या महिलेला दुसऱ्या योजनेतून 1,000 रुपये मिळाले आणि तिने लाडकी बहिण योजनेत नाव नोंदवले, तर तिला पूर्ण 1,500 रुपये ऐवजी 500 रुपये मिळतील. Ladki Bahin Yojana News Today
लाडकी बहीण योजना लाभार्थी पडताळणी
पालघर, यवतमाळ, वर्धा आणि सातारा येथील फलटण यांसारख्या जिल्ह्यांमधून बोगस लाभार्थी प्रकरणी तक्रारी आल्या आहेत, ज्यामुळे मंत्रालयाने क्रॉस-व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. चौकशीअंती अडीच कोटी लाभार्थ्यांपैकी किती जणांना काढून टाकता येईल, हे सध्या स्पष्ट होत नसल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. पुढील 5 गोष्टींची तपासणी केली जाणार आहे.
- ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार पडताळणी
- चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी
- एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार पडताळणी
- लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी
- आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची पडताळणी होणार
पाठवा ही माहिती तुमच्या बहिणींना व मैत्रिणींना लगेच.
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
ही अपडेट पहा :
Thank You!