Bima Sakhi Yojana Information in Marathi

मित्रांनो सध्या एलआयसीची Bima Sakhi Yojana खूप चर्चेत आहे. आणि आज आपण या लेखामध्ये या योजनेबद्दल ची सर्व माहिती पाहणार आहोत. कारण या योजनेमद्धे 10वी पास महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे.
पुढे या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे. जसे की अर्ज पद्धत, आवश्यक पात्रता, मिळणार लाभ कसा मिळणार आहे. अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्या.
राज्यातील व देशातील महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
विमा सखी योजना नेमकी काय आहे?
तर आता आपण जाणून घेऊया की विमा सखी योजना नेमकी आहे तरी काय? विमा सखी योजना ही एलआयसीची (LIC) एक खास योजना आहे. या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करु शकतात. या योजनेच्या अंतर्ग महिलांना तीन वर्षांसाठी स्टायपेंड मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना एकूण तीन वर्षांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
या कालावधीत महिला एलआयसी ( LIC ) एजंट म्हणून काम करु शकणार आहेत. ज्या महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे अशा महिलांना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येणार आहे. त्यामुळे या योजने द्वारे महिलांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.
ही अपडेट पहा : Krushi Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कृषी विभाग, रायगड मध्ये नवीन भरती! असा करा अर्ज

Bima Sakhi Yojana Criteria
महत्वाच्या अटी :
- महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करणारी महिला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसंच या योजनेसाठी महिलेचं वय कमीत कमी १७ आणि जास्त ७० वर्षे असणं आवश्यक आहे.
- तीन वर्षांचं प्रशिक्षण घ्यावं लागेल, त्यानंतर या महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येईल.
Bima Sakhi Yojana Benefits
अशा पद्धतीने मिळणार पैसे :
या योजने अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या महिलांना स्टायपेंड दिलं जाणार आहे. त्यांना पहिल्या वर्षी प्रति महिना 7000 रुपये, दुसऱ्या वर्षी प्रति महिना ६000 रुपये तर तिसऱ्या वर्षी ५000 हजार रुपये दिले जातील. यामध्ये कमिशनचा समावेश नसेल. कमिशनच्या रुपात मिळणारे पैसे वेगळे असणार आहेत.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मिळणारं ६ हजार आणि ५ हजार मिळण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या वर्षी ज्या पॉलिसी काढून दिल्या आहेत त्यातल्या ६५ टक्के योजना दुसऱ्या वर्षीही सुरु असल्या पाहिजेत. अशा पद्धतीने महिलांना पैसे मिळणार आहेत.
Bima Sakhi Yojana Eligibility
या आहेत अटी :
- विमा सखी योजनेसाठी ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांच्यापैकी कुणीही एलआयसी ( LIC ) कर्मचारी असता कामा नये.
- तसेच त्यांच्या नात्यातही कुणी एलआयसी कर्मचारी असता कामा नये.
- ज्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत काम मिळेल त्या महिला एलआयसीच्या नियमित कर्मचारी नसतील.
Bima Sakhi Yojana Apply Online
अशा पद्धतीने अर्ज करा :
- एलआयसी ( LIC ) विमा सखी योजनेसाठी एलआयसीच्या अधिकृत https://licindia.in/test2 या वेबसाईटवर जा.
- या ठिकाणी विमा सखी योजनेवर लिंकवर क्लिक करा.
- त्यात तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी आणि पत्ता पोस्ट करा.
- त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करुन अर्ज सबमिट करा.
- १० वी पास झाल्याचं प्रमाणपत्र, पत्त्यासाठीचा पुरावा, वयाचा पुरावा ही कागदपत्रं आवश्यक आहेत.
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
💻 ऑनलाइन अर्ज | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
ही माहिती तुमच्या बहिणींना व मैत्रिणींना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.
हेही पहा :