Maharashtra News Today: मित्रांनो आत्ताच राज्यामध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. आणि एकीकडे राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते EVM मशीनवर आक्षेप घेत असताना राज्यातील एका गावाने मोठे पाऊल उचलले आहे. आणि आता त्या गावामध्ये 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपर वर पुनः मतदान होणार आहे.
आणि असा निर्णय घेणारे हे माळशिरस (Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी गाव आहे. हे गाव आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. मारकडवाडी गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते.
मात्र यावेळीच्या मतदान मध्ये विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना जास्त मतदान मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.
गावाने उचलले मोठे पाऊल

Maharashtra News Today: येथील गावकऱ्यांनी तहशीलदार यांना जे निवेदन दिले आहे त्यामध्ये मौजे मारकडवाडीमधील चाचणी निवडणूक घेण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यात गावात यंदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचे सांगितले आहे.
या अघोदर जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक (Maharashtra News Today) आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे काही पुरावे यामध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे.
यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. Maharashtra News Today
3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान
पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता या मतदान प्रक्रियेत विरोधी भाजपचे मतदार सामील होणार का? हा प्रश्न असून या मतदानाचा पुढाकार गावातील एका गटाने घेतल्याने दुसरा गट आता काय भूमिका घेणार? हे मतदानादिवशी पाहायला मिळणार आहे. या मतदान प्रक्रियेस शासन स्तरावरून कर्मचारी पुरवणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमांकडून ही मतदान प्रक्रिया पार पाडायची तयारी ठेवली आहे.
यासाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून लगेच चारनंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती माध्यमाद्वारे मिळत आहे. फेरमतदानाची मागणी संपूर्ण गावाने मिळून केली असती तर यातून काहीतरी फलित समोर आले असते. परंतु कमी कमी मते मिळालेल्या जानकर गटाने केलेल्या या प्रयोगास गावातील विरोधी गट सहकार्य करणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Maharashtra News Today
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
हेही पहा :