Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: 10वी आणि 11वी पास विद्यार्थ्यांना ₹10,000 Scholarship, असा करा अर्ज

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025 in Marathi

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025

मित्रांनो जर तुम्ही दहावी किंवा अकरावी पास असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra Vidyadhan Scholarship 2025 द्वारे विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. ही स्कॉलरशिप SDF Foundation कडून राबवली जाते. त्यामुळे या स्कॉलरशिप योजनेचा लाभ नक्की घ्या.

SDF Foundation ही राष्ट्रीय पातळीवरील विश्वसनीय संस्था आहे. ही संस्था वर्षांवर्ष गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यक करत असते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षासाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये एकूण 11 व्या आणि बारावीच्या दोन वर्षांसाठी एकत्रित वीस हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुढे तुम्हाला या स्कॉलरशिप बद्दलची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. जसे की, यामध्ये निवड प्रक्रिया काय आहे?, अर्ज प्रक्रिया कशी आहे?, आवश्यक पात्रता काय असली पाहिजे इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

महाराष्ट्र विद्याधन स्कॉलरशिप 2025

शिष्यवृत्तीचे नावमहाराष्ट्र ११वी विद्याधन शिष्यवृत्ती २०२५
स्कॉलरशिप चे उद्दिष्टआर्थिक दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत
शिष्यवृत्तीची मिळणारी रक्कम₹10,000/- प्रतिवर्ष (११वी आणि १२वी साठी)

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025 Eligibility

आवश्यक पात्रता : या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • विद्यार्थी हा मूलतः महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
  • १०वी परीक्षा २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातून उत्तीर्ण केलेली असावी
  • सध्या ११वी किंवा डिप्लोमा प्रथम वर्षात शिकत असावा
  •  सामान्य विद्यार्थ्यांसाठी: किमान ८५% गुण किंवा ८.९ CGPA
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी: किमान ७५% गुण किंवा ७.९ CGPA
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹2 लाखांपेक्षा कमी असावे

जर तुम्ही या अटींची पूर्तता करत असाल तर तुम्हाला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो.

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025 Document

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करत असताना तुम्हाला पुढील कागदपत्रे लागणार आहेत. कारण हे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.

  • पासपोर्ट साइज फोटो
  • 10वी ची गुणपत्रिका
  • उत्पन्न प्रमाणपत्र (महसूल अधिकाऱ्यांकडून; राशन कार्ड ग्राह्य नाही)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025 Selection Process

निवड प्रक्रिया : विद्यार्थ्यांची निवड ही पुढील प्रक्रिये द्वारे करण्यात येते.

  • Shortlisting: शैक्षणिक गुणवत्ता आणि कौटुंबिक पार्श्वभूमीच्या आधारे SDF Foundation कडून प्राथमिक निवड म्हणजेच शॉर्टलिस्टिंग केली जाते.
  • ऑनलाईन परीक्षा: शॉर्टलिस्ट मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलावले जाते.
  • मुलाखत (Interview): परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येते.
  • गृहभेट: अंतिम निवडीपूर्वी विद्यार्थ्याच्या घराची भेट घेण्यात येईल.
  • निवासी प्रशिक्षण शिबिर: निवड झालेल्या विद्यार्थ्यांना SDF तर्फे आयोजित शिबिरात भाग घ्यावा लागेल.
  • पालक प्रवास भत्ता: एका पालकाचा प्रवास खर्च SDF तर्फे दिला जाईल.

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2025 अर्जाची शेवटची तारीख आहे.

परीक्षेची तारीख : 10 ऑगस्ट 2025 रोजी.

मुलाखतीची तारीख : 25 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
इतर अपडेटयेथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :