Agriculture Loan Scheme In Maharashtra

Agriculture Loan Scheme : मित्रांनो सध्या दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. आणि कृषी क्षेत्राला उपयोगी पडणार्या कच्च्या माल विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशातच रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने उपाय म्हणून शेतकऱ्यांसाठी विना तारण कर्जाची मर्यादा वाढवली आहे. या अघोदर 1.6 लाखांचं कर्ज मिळत होते. पण आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
आता शेतकऱ्यांना विना तारण (काहीही न गहाण ठेवता) दोन लाखांचं कर्ज RBI मधून काढता येणार आहे . त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही देखील शेतकरी असाल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आपल्या व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
RBI Agri Loan New Announcement
मोठी बातमी : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांना मदतीसाठी आता विना तारण दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आत्ताच्या स्थितीमद्धे शेतकर्यांना विना तारण 1,60,000/- रुपयांचे कर्ज देण्यात येते. आता ही मर्यादा दोन लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा : Maharashtra Fisheries Department Bharti 2024: महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग मध्ये नवीन भरती! पगार – 35,000 रुपये
रेपो दर आहे तोच : आरबीआय चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही मोठी घोषणा मात्र केली पण रेपो दर मध्ये कसलाही बदल केला नाही. चालू आर्थिक वर्षातील पाचव्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णय जाहीर केले. त्यानुसार 11 व्यांदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पण कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये घट झाली आहे. CRR 4.5 टक्क्यांहून 4 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या नवीन धोरणामुळे बँकांना 1.16 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होणार आहे. Agriculture Loan Scheme

सविस्तर माहिती (Details) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
ही अपडेट पहा :
Thank You!